कार च्या धडकेत दुचाकीचालकासह सहपाठीचा अपघाती मृत्यु.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 9 :- चिमूर तालुक्यातील भिसी वरून उमरेड कडे खाजगी कामानिमित्त दुचाकी ने जात असलेल्या दोघांना मागेहून भरधाव वेगाने येत असलेल्या कार चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच अपघाती मृत्यू झाला तर दुसऱ्याचा कामठी येथील आशा हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून मृतकाचे नाव कैलास कांढरकर वय 50 वर्षे रा भिसी तसेच अनिल ठोंबरे वय 42 वर्षे रा भिसी ता.चंद्रपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दोन्ही मृतक हे दुचाकी क्र एम एच 34 बी एम 5487 चा चालक मृतक कैलास कांढरकर हे मृतक सहपाठी अनिल ठोंबरे हे उमरेड ला खाजगी कामाने जात असता मागेहून येणाऱ्या कार ने दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

30 वर्षीय मतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार..

Tue May 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनी खलाशी लाईन, कादर झेंडा रहिवासी एका 30 वर्षीय तरुणीवर आरोपीने पीडित मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचा फायदा घेत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 फेब्रुवारी 2023 ते 6 मे 2023 या कालावधीत घडली असून यासंदर्भात फिर्यादी पीडित मतिमंद तरुणीच्या आईने स्थानिक जुनी कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com