सेवा पंधरवाड़ा अंतर्गत मनपाची विशेष शिबिरे  प्रत्येक झोनमधे होणार सेवा शिबिर

चंद्रपूर :-  झिरो पेंडसी अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोन क्षेत्रात विशेष शिबीर लावले जाणार आहे. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान हे शिबीर आयोजीत केले जाणार असुन नागरीकांना विविध योजनांच्या सेवा एकाच जागी मिळणार आहेत.

२७ सप्टेंबर रोजी झोन १ चे शिबीर तुकूम येथील स्वामी समर्थ बगीचा, धांडे हॉस्पीटल जवळ येथे, झोन २चे शिबीर २८ सप्टेंबर रोजी आझाद गार्डन येथे तर झोन ३ चे शिबीर २९ सप्टेंबर रोजी झोन ३ कार्यालय परिसरात आयोजीत केले जाणार आहे. या विशेष शिबिरात शासनाच्या विविध योजना जसे पंतप्रधान स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, एकल खिडकी, विवाह नोंदणी, जन्म – मृत्यु प्रमाणपत्र, मालमत्ता कर, बचतगट कर्ज, दिव्यांग ओळखपत्र, आरोग्य शिबीर, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रमाणपत्र, नवीन नळ जोडणी इत्यादींशी प्रलंबित प्रकरणांचे निराकरण केले जाणार आहे.

राज्य शासनाच्या सुचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत १० सप्टेंबर २०२२ पर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे जर नागरिकांचे काही प्रलंबित अर्ज, तक्रारी असतील तर ते लवकर निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच संबंधित विभागाच्या पोर्टलवर प्रलंबित असलेले अर्ज, विविध माध्यमातुन प्राप्त झालेल्या तक्रारी १० सप्टेंबर २०२२ पर्यंत १०० टक्के निकाली काढण्याच्या दृष्टीने मनपाच्या सर्वच विभागांनी काम सुरु केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com