छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव नामांतराबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मानले आभार

चंद्रपूर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव या नामांतरास केंद्र सरकारने मान्यता दिल्याने आपल्याला अत्यंत आनंद झाला असून या बहुप्रतिक्षीत नामांतरासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

मंत्री सुधीर मुनगंटीवार आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले की, मी विधानसभेत अनेकदा हा विषय उपस्थित केला होता. उस्मानाबादचे मूळ प्राचीन नाव धाराशिव आहे. परकीय आक्रमकाने दिलेले नाव बदलून मूळ धाराशिव हे नाव द्यावे ही स्थानिक जनतेची मागणी होती. औरंगाबाद शहराचे नाव मुघल आक्रमक औरंगजेबाच्या नावावरून पडले होते. त्यामुळे हे नाव बदलणे अत्यावश्यक होते, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कंपन्या, उद्योगांशी समन्वय साधत रोजगार उपलब्ध करून देणार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Sun Feb 26 , 2023
बोरिवली रोजगार मेळाव्यात 7,138 पदांकरीता विविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती मुंबई : कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्याबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कौशल्य विकास विभागातर्फे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधत आगामी काळात पाच लाख रोजगार देण्यात येतील. त्यासाठी राज्यभरात 300 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!