हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे आश्वासन !

कुठल्याही परिस्थितीत विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच ! –

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार

नागपूर :-  गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण आम्ही हटवणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाची बाजी लावून गडकिल्ले जिंकले आहेत. आपण कायद्याची बाजू लावून धरणार आणि गडांवरील अतिक्रमणे हटवणारच. एकशेएक टक्के आम्ही गडावरील अतिक्रमणे हटवू. अनधिकृत बांधकाम करणार्‍यांकडून विरोध होत असला, तरी सरकार अतिक्रमण हटवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, याविषयी आमचा निर्धार पक्का आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिले. राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर झालेली अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात ‘हिंदु जनजागृती समिती’चे राज्य संघटक आणि ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे प्रवक्ता सुनील घनवट यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.

अतिक्रमणे हटवणार्‍या वनविभागाच्या अधिकार्‍यांना काही धर्मांधांकडून, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून धमक्या येत आहेत, याविषयी समितीचे घनवट यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांना सांगितले. याविषयी  मुनगंटीवार म्हणाले की, कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही अतिक्रमणे हटवणार आहोत. धमक्या देणार्‍यांवरही आम्ही कारवाई करू. समितीने दिलेल्या निवेदनांच्या संदर्भात बोलतांना सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, तुम्ही दिलेली गडकिल्ल्यांच्या संदर्भातील निवेदने वेगवेगळ्या खात्यांशी संबधित आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती मागवून घेण्याचे आदेश दिले. विशाळगडावर शासकीय योजना राबवून अतिक्रमण झाले असेल, तर ते गंभीर आहे. कुठल्याही परिस्थितीत ती सुद्धा अतिक्रमणे काढली जाणारच आहेत.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या थडग्याभोवतीचे वर्षानुवर्षे ‘संरक्षित’ केलेले अतिक्रमण हटवले, यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदनही करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे धडक कारवाई  

Fri Dec 23 , 2022
 नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.22) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.72, शंकरनगर येथील सुरेन्द्र वाधवा यांच्याविरुध्द बांधकामादरम्यान वाहन भरुन मनपाची सांडपाण्याची लाईन फोडल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com