संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ताण-तणावापासून काही वेळ आराम मिळावा व आल्हाद वातावरण निर्मिती होऊन मनोरंजन व्हावे याकरिता नागपूर शहर चे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी “सिंगल पॅटर्न “या उपक्रमांतर्गत अजून एक दखल घेतली असून त्यांनी पोलीस अधिकारी यांचा आपसातील क्रिकेटचा सामन्याचे नियोजन केले ! आज रविवार दि.२६ मे २०२४ रोजी स. ६.०० वा. पोलीस मुख्यालय येथील मैदानावर पोलीस अधिकारी यांचा आपसात क्रिकेटचा सामना घेण्यात आला. या सामन्याकरिता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त ,इतर वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. पोलीस अधिकाऱ्यांच्या क्रिकेटचे २ चमू तयार करण्यात आले. चमू ” अ ” व चमु ” ब ” !
” अ” चमूचे कर्णधार पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल तर चमू ” ब” चे कर्णधार निमित गोयल डीसीपी डिटेक्शन हे होते. चमू अ यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करीत 12 षटकात मध्ये 95 धावा काढले तर चमू “ब” यांनी प्रत्युत्तर देत 75 धावा काढल्या. सदरचा सामना चमू “अ ” 20 धावा ने जिंकून विजय मिळविला. 6 विकेट्स घेतल्याबद्दल सामनावीर म्हणून पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांना देण्यात आले. या क्रिकेटच्या सामन्याकरिता खालील पोलीस अधिकारी यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. १. पोलीस उपायुक्त निकेतन कदम, गोरख भामरे, अनुराग जैन, अर्चित चांडक, राहुल मदने, डॉ. अश्विनी पाटील, शशिकांत सातव, विजयकांत सागर , सहाय्यक पोलीस आयुक्त नयन अलुरकर, सुधीर नंदनवार व इतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उपस्थिती दर्शविली. क्रिकेटच्या सामन्यानंतर शेवटी पोलीस आयुक्त यांनी नमूद केले की, “सर्वजण खूप चांगले खेळले, उन्हाळ्याचे दिवस सुरू असून नागपूर मध्ये सध्या “नवतप ” सुरू आहे. उन्हाचा त्रास होईल असे वाटत होते परंतु मन स्वच्छ असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या जुळवून येतात. आम्ही सर्वांनी क्रिकेटचा सामन्याचा खूप आनंद घेतला व हाच मुख्य उद्देश होता या सामन्याचे आयोजन करण्याचा! पोलीस विभाग म्हटलं तर, ताण तणाव असतोच. रात्री उशिरापर्यंत बरेच पोलीस अधिकारी व्यस्त होते पण तरीदेखील ते सकाळी लवकर उठून मैदानावर आले. पोलिसांना सर्वच कर्तव्य बजावे लागतात. छान वातावरण होते” यावेळी पोलीस आयुक्त यांनी यापुढेही आपण याच प्रमाणे खेळाचे आयोजन करून सामने घेत राहू आणि स्वस्थ राहू असे आश्वासन सर्वांना दिले. धकाधकीच्या जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्यकरिता या उपक्रमाचे कौतुक होत आहे.