कीर्तीचक्र पुरस्कारप्राप्त प्रभाकर पुराणिक यांच्यावर अंत्यसंस्कार

जिल्हाधिकाऱ्यांनी वाहिले पुष्पचक्र ; पोलीसांची सलामी

नागपूर : लष्कराच्या कीर्तीचक्र या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे विदर्भातील एकमेव मानकरी प्रभाकर पुराणिक (86 वर्षे) यांच्या पार्थिवावर आज अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.शिल्पा खरपकर, सहायक जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी सुबेदार मेजर सतेंद्रकुमार चवरे,मेजर जनरल (निवृत्त) देव,माजी महापौर संदिप जोशी यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, महानगर पालिकेचे अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिक आदी उपस्थितांनीही आदरांजली वाहिली.

पोलीस तुकडीने मानवंदना दिली व विविध शासकीय व सैनिक संघटनांच्यावतीने यावेळी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.

प्रभाकर पुराणिक यांचे सोमवारी (16 जानेवारी) सायंकाळी निधन झाले. देशाच्या सीमा भागात रस्ते निर्मिती करणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनमध्ये अभियंता म्हणून कार्य करणाऱ्या पुराणिक यांना 1972 मध्ये शातंताकाळातील शौर्य पुरस्कार किर्तिचक्राने सन्मानित करण्यात आले होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाळांमधून वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळावे - शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर 

Wed Jan 18 , 2023
रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप  नागपूर : शालेय जीवनात बालमनावर संस्कार घडतात याच काळात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळाल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच शाळांमधून वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळावे, अशा भावना आज शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांनी येथे व्यक्त केल्या. जिल्ह्यात 11 जानेवारी पासून राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!