नागपूर येथील झिरो माईल च्या जागेसाठी भोई, धिवर समाजाचे साखळी उपोषण

भारतीय भोई विकास मंडळाचे नेतृत्वात १६ जानेवारी पासून साखळी उपोषण

नागपूर :-भारतीय भोई विकास मंडळ व विविध संघटनाच्या वतीने १६ ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत साखळी उपोषण विविध मागण्यासाठी करण्यात येत आहे. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यानंतर स्व.माजी खासदार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

उल्लेखनीय आहे की,भारतीय भोई विकास मंडळ,भोई समाज पंचकमेटी,भोई विद्यार्थी संघटना,भरारी सोशल फाउंडेशन,भोई समाज सेना.भोई समाज अधिवक्ता परिषद, विदर्भ भोई समाज सेवा संघ,विदर्भ मछलिमार भोई समाज समिती, भारतीय जनसम्राट पार्टी,आदिवासी धीवर समाज संघटना, धीवर समाज महिला संघटना, निषाद पार्टी,भोई धीवर समाज कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, भोई समाज महिला बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर जिल्हा भोई समाज संघच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात २६ डिसेंबरला विराट मोर्चा काढण्यात आला होता.महाराष्ट्राचे मत्सोद्योग व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले होते.मात्र त्यांनी सात दिवसात बैठक बोलावण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र सात दिवस लोटूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने झिरो माईल येथील स्व.माजी खासदार जतिराम बर्वे इमारत बांधकाम तोडण्यात आले होते. त्याच जागेवर इमारत शासन खर्चातून बांधण्यात यावी यासाठी स्व.माजी खासदार जतीराम बर्वे यांच्या पुण्यतिथी निमित्तचे औचित्य साधुन १६ ते २५ जानेवारी पर्यंत साखळी उपोषण व मागणी पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी पासून आमरण उपोषणाला मंडळाचे अध्यक्ष एड.दादासाहेब वलथरे बसतील. आज पहिल्या दिवशी प्रकाश डायरे, महासचिव दिलीप मेश्राम, भाऊराव कलसार,देहू खेडकर,मंगला सातव यांनी साखळी उपोषणाला बसले होते. व या उपोषणाला खासदार कृपाल ,भिमशक्तिचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे सह अन्य मान्यवरांनी व समाजातील नागरिकांनी भेटी देऊन समर्थन केले.

याप्रसंगी एड.दादासाहेब वलथरे,प्रकाश डायरे,एड. दिघोरे ,एड. वालबेकर,पी. ए.बावनकुळे,किशोर करतार, सेवानिवृत्त न्यायाधिश चंद्रलाल मेश्राम,अशोक बर्वे, प्रभाकर मांढरे, दीनानाथ वाघमारे,दिलीप पारसे,जितेंद्र भोयर,नंदू पडाल,सुरेश ठाकरे,राजेश मानकर, सुतेश मारबते,उमाशंकर नामदेव, नामदेव कंन्नाके,सुरेश प्रसाद,भाऊराव कलसार, कांतीलाल लकरिया, चित्रा बाथम,अशोक मोरे,मुकुंद अडेवार,सुंदरलाल लिल्लारे, चंद्रशेखर दाते, शालिकराम बोंद्रे,संजय नांन्हे, मारोतराव भोयर, अमोल ठाकूर, इत्यादिसह समाजातील हजारो नागरिकांनी भेटी देऊन समर्थन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विविध देशांच्या मुंबईतील राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

Tue Jan 17 , 2023
मुंबई :-विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व डीन ऑफ काॅन्सुलर कोर अँड्रिया कून तसेच कॉन्सुलर कोर संघटनेचे उपप्रमुख विजय कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात ३५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  सध्याचे युग हे परस्पर सहकार्याचे आहे. अश्यावेळी विविध देशांच्या प्रतिनिधींमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights