नागपूर :-पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्फोटिंग क्लब दौवलामेटीला नागपूर च्यावतीने परिषदेमध्ये शरद मेश्राम यांनी सांगितले की, 18 फेबुवारी ला सकाळी ८ वाजता डिफेंन्स गेट अमरावती रोड नागपूर येथून कोंढाळी असे 35 किलोमीटर जाणे आणि 35 किलोमीटर येणे या सायकल स्पर्धेचे आयोजन पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सपोर्टिंग द्वारा करण्यात आले असून अनेक जिल्ह्यातून – राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक या ठिकाणी भाग घेतील. यामध्ये प्रथम पुरस्कार इम्पोर्टेड रेसिंग सायकल तर दुसरे पुरस्कार रेसिंग किट व तिसरे पुरस्कार टायटन कंपनीचे स्मार्ट वॉच व प्रोत्साहन पुरस्कार शिल्ट व प्रोत्साहानात्मक सर्टिफिकेट प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता राज गजभिये प्रमुख पाहुणे व उपसंचालक क्रीडा विभागीय शेखर पाटील व दीक्षाभूमी ट्रस्टी विलास गजघाटे यांची उपस्थिती राहतील. पत्रपरिषद संबोधित करतेवेळी शरद मेश्राम, सुरेश ठाकरे, बापू दहिवाले, अशोक मंडरेकर, सौरभ रंगारी, समाधान चौरपगार, वासुदेव वानखेडे, कमलेश कोचे, आशिष मोंन्डे,नितीन अडसड यांची उपस्थिती होती.