-शोध पथकाने केला दंड वसूल
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे वाढदिवसाच्या समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. मनपाच्या गांधीबाग झोन अंतर्गत रमेश दायरे, दसरा रोड, तुलशीबाग येथे वाढदिवस कार्यक्रमामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु ५ हजार तसेच सचिन राव हिरुलकर बजेरिया येथेसुध्दा वाढदिवस कार्यक्रमामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु १० हजार दंड लावण्यात आला.
त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत प्रल्हाद आनंद लॉन व गोथरा लॉन टेका नाका, कामठी रोड, श्याम लॉन काटोल रिंग रोड, राज सेलिब्रेशन गोरेवाडा रिंग रोड यांच्या विरुद्ध कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु २५ हजार प्रत्येकी असे रु १,००,००० चा दंड लावण्यात आला. मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांनी नुकतेच एक आदेश काढून समारंभात ५० लोकांची उपस्थितीचे बंधन घातले आले. तसेच मंगलकार्यालय, लॉन मालकांना त्यांच्याकडील आयोजनाची माहिती संबंधित झोनला देणे आवश्यक आहे.
उपद्रव शोध पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत लोकप्रिय देशी वाईन शॉप आणि धंतोली झोन अंतर्गत एस.एम.ई.वाईन शॉप वर कारवाई करुन प्रत्येकी रु ५००० चा दंड लावण्यात आला. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.
उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ७१ पतंग दुकानांची तपासणी केली. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली