कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

नागपूरता. १९ :   नागपूर महानगरपालिके तर्फे बुधवारी (१९ जानेवारी) रोजी ९ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ८५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत बी.एस.एज्युकेशन द अप्टीटयुट स्कुल, फोरचुन मॉल, सिताबर्डी येथे यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला. तसेच नेहरुनगर झोन अंतर्गत आयडीयल कोचिंग इन्स्टीटयुट आशिर्वादनगर येथे कारवाई करुन २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.

          प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या  दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

          बुधवारी (ता.१९) धरमपेठ  झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ येथील इंदुयश अपार्टमेंट, रामनगर चौक येथील बिर्यानी बाय किलो वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत टेलीफोन एक्सेंच चौक येथील महेश किराणा स्टोअर्स आणि श्याम ट्रेडर्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच आशीनगर झोन मधील कमाल बाजार येथील ताहुर गारमेंट आणि मनमोहन किराणा शॉप या दुकानांवर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

             मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बांधकाम नकाशाच्या मंजुरीसाठी दिरंगाई करू नका

Wed Jan 19 , 2022
-स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांचे नगर रचना विभागाला निर्देश नागपूर, ता. १९ : मनपाच्या नगर रचना विभागाकडे नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अनके अर्ज प्राप्त होत असतात. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही नगर रचना विभागाकडून बांधकामाच्या नकाशाला लवकर मंजुरी मिळत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अर्जात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या नागरिकांना त्रास न देता त्यांना लवकर मंजुरी द्यावी, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!