कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

नागपूरता. १५ :  नागपूर महानगरपालिके तर्फे मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रोजी ०६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ३५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्यामकर व्हेंचर्स इन्फ्रा यांच्या विरूध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल आणि मेहाडिया चौक धंतोली येथील बेरर फायन्स लि. यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला.

          त्याचप्रमाणे धंतोली झोन मधील प्रभु नगर येथील मनोज पटेल यांच्या विरूध्द खुल्या भुखंडावर  कचरा टाकल्याबद्दल आणि उल्लासनगर येथील सिध्दी विनायक बिल्डर्स यांच्या विरूध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून रु १५,००० च्या दंड वसूल केला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत बजेरिया येथील अनंता अडयाडवाले यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला.

          मंगळवारी (ता.१५) सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने सतरंजीपूरा तांडापेठ, चन्द्रभागा नगर येथील महादेव स्वीटस वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत सेवालाल महाराज  यांना जयंती निमित्त अभिवादन

Tue Feb 15 , 2022
मुंबई, दि. 15 :- संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.  वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. समाजात बुद्धीप्रामाण्य, विज्ञानवाद रूजावा यासाठी संत सेवालाल महाराज यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांनी समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचले, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com