प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३,४९० लाभार्थ्यांची नोंदणी

– मनपा समाज विकास विभागामार्फत योजनेचा लाभ घ्या

– आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे आवाहन  

नागपूर :-  केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम विश्वकर्मा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्या माध्यमातून ३ हजार ४९० लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी दिली.

मनपा उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात मनपा समाज विकास विभागाच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची (PM Vishwakarma) अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेची नोंदणी करण्याकरिता नागपूर शहरातील नागरी सुविधा केंद्रामार्फत (CSC) नोंदणी करण्यात येत आहे. सद्यस्थिती नागपूर शहरातील ३ हजार ४९० लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी केली आहे. केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा या महत्वाकांक्षी योजनेचा नागपूर शहरातील जास्तीत जास्त पारंपरिक कारागिरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेद्वारे सुतार, लोहार, सोनार, परीट, खेळणी बनविणारे, मूर्तिकार, मालाकार, टेलर, गवंडी, नाभीक, चर्मकार, बांबूपासून वस्तू तयार करणारे, झाप बनविणारे, नारळाच्या काथ्यापासून वस्तू बनविणारे, झाडू व दोर बनविणारे, मच्छीचे जाळे बनविणारे आशा १८ पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय मंत्रालयाच्या वतीने या सर्व कारागिरांना त्यांच्या व्यवसायाचे १५ दिवस प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तरुणांनो, मतदार जागृतीचे रील बनवा, लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हा

Sat Mar 16 , 2024
– उत्कृष्ट रील होणार अधिकृत रील म्हणून प्रसिद्ध : २४ मार्चपर्यंत स्पर्धा नागपूर :- नागपूर शहर आणि जिह्यामध्ये मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम (स्वीप) प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. तरुणांनो, मतदार जनजागृतीसाठी रील तयार करा, ते सोशल मीडियावर अपलोड करा आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com