फ्रान्सचे कौंसिल जनरल जेन मार्क सेरे शेवरले यांची मनपाला भेट

मनपा आयुक्तांशी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पावर चर्चा

नागपूर :- कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले (Jean Marc SereCharlet) यांनी बुधवारी (ता.१४) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे आणि मनपाचा मानाचा दुपट्टा देउन स्वागत केले.

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले यांच्याशी आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी शहरातील नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासंदर्भात चर्चा केली.

याप्रसंगी लिओनेल गोमेरिक, कौंसिल जनरल ऑफ फ्रान्सचे प्रतिनिधी अभय टिकेकर, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, एनएसएससीडीसीएल चे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, नाग नदी प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल, स्मार्ट सिटीचे डॉ. पराग अरमल आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्तांनी नागपूर शहराविषयी माहिती दिली. नागपूर शहर हे देशातील ऐतिहासिक शहर असून शहराच्या मध्यभागातून वाहणारी नाग नदी हे शहराचे वैभव आहे. कालाच्या ओघात नदीचे सौंदर्य बाधित झाले. त्यामुळे या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या कोनशिलेचे नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत नदीच्या सौंदर्यीकरण कार्यासाठी एजेन्सी फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)चे मोठे सहकार्य लागणार आहे. संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यात असून प्रदूषण आटोक्यात आणने हे प्रकल्पाचे प्राधान्य कार्य आहे. यापुढे रिव्हर फ्रन्ट डेव्हलमपेंटचे कार्य केले जाणार आहे. या संपूर्ण कार्यात फ्रान्सचे मोठे सहकार्य मनपाला आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

याशिवाय शहरात अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार होत असून या कार्यातही फ्रान्सद्वारे आर्किटेक्चर आणि नगर विकासासंबंधी नियोजनाबाबत तांत्रिक सहकार्य मिळाल्यास त्याचाही शहराला भौतिक आणि महसूलात्मक दृष्ट्या फायदा होउ शकेल, अशी अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.

कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले यांनी नागपूर शहरात पहिल्यांदाच येत असल्याचे सांगत शहराविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. स्मार्ट सिटी प्रकल्प, नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाची माहिती घेताना त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातही त्यांनी पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने चर्चा केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांना हिंदू महासभेतर्फे अभिवादन

Thu Dec 15 , 2022
नागपूर :- धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या जयंतीचा कार्यक्रम हिंदू महासभेच्या, टिळक रोड, महाल येथील कार्यालयात दि. 12/12/2022 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी डॉ. बा. शि. मुंजे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अरूण जोशी म्हणाले, “आज देशाला धर्मवीर डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com