खालापूरात १५ जुलैला रंगणार “व्हॉईस ऑफ मीडिया”चे कोकणस्तरीय संमेलन 

* पत्रकारांच्या कुटुंबीयांविषयी मेळाव्यात होणार चर्चा

* कोकणातील ज्येष्ठ पत्रकारांचा होणार सन्मान

रायगड :- कोकणात व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे कोकणस्तरीय संमेलन होत आहे. या संमेलनाची जय्यत तयारी झाली असून अवघ्या कोकण विभागातील पदाधिकारी, पत्रकार या संमेलनासाठी येणार आहेत. पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ घातलेल्या या संमेलनात अनेक मान्यवरही सहभागी होणार आहेत.

सकारात्मक पत्रकारिता रुजावी, पत्रकारांचे बेसिक विषय मार्गी लागावेत, यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने देशभर काम उभे केले आहे. सर्व देशात संघटनात्मक बांधणी झाल्यावर आता प्रत्येक राज्यात , विभागात पत्रकारांचे मेळावे आयोजित केले जात आहेत. राज्यातील कोकण विभागाचा मेळावा, संमेलन उद्या दिनाक १५ जुलै २०२३ ला होत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, नवी मुंबईतील पत्रकार, पदाधिकारी यात सहभागी होतील. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय संघटक पत्रकार खलील सुर्वे, राष्ट्रीय प्रवक्ता नरेश जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष प्रवीण कोळआपटे, रायगड जिल्हाध्यक्ष प्रभाकर गंगावणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर माने, पत्रकार निवास सोनावळे, पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव, पत्रकार ओंकार नागांवकर हे या संमेलनासाठी परिश्रम घेत आहेत. उद्या शनिवारी कोकण मॅरेज हॉल अंजरूण गांव, कर्जत-खालापूर महामार्ग, ता. खालापूर (जि. रायगड) येथे सकाळी १० वाजल्यापासून हे संमेलन सुरू होणार आहे.

या संमेलनाध्यक्षपदी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आहेत. स्वागताध्यक्ष पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी आहेत. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे उर्दू विंग राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारूण नदवी, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, आरोग्य विंग अध्यक्ष भिमेश मुतुला, रेडीओ विंग प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, सोशल विंग अध्यक्ष जयपाल गायकवाड, साप्ताहिक विंग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, साप्ताहिक विंग संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अब्दुल कय्युम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, पत्रकारांसाठी कौशल्य (स्किल), रिटायर्डमेंट नंतर पुढे काय?, पत्रकारांसाठी घर, पत्रकारांसाठी विमा आदींबाबत राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे मार्गदर्शन करतील. यासोबतच या कोकणस्तरीय अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार, यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संमेलन संयोजक तथा व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी दिली.

संमेलनात सहभागी होण्यासाठी हा फॉर्म आवश्यक आहे. त्यासाठी गुगल फॉर्म : https://forms.gle/yepv7C2oUj83z2Rp9

अधिक माहितीसाठी या 8454886853 फोन नंबरवर संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीआयपी लोगों की गुलामी संस्कृती से ग्रस्त यातायात प्रशासन खुद ही उड़ा रहे हैं अपने ही नियमों और कानूनों की धज्जियां

Sat Jul 15 , 2023
– ट्रैफिक सिग्नल शुरू रखकर 15-20 मिनट रोके रखा वाहन चालकों को नागपूर :- एक तरफ केंद्र सरकार और सर्वोच्च न्यायालय देश से वीआयपी और लाल बत्ती कल्चर खत्म करने का दावा कर रही हैं वहीं दूसरी ओर खुद यातायात प्रशासन अभी तक वीआयपी लोगों की गुलामी वाली संस्कृती में जकड़ा हुआ हैं. वरिष्ठ अधिकारियों के आदेश पर दिये गये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com