नागपूर :- मानेवाडा रोडवरील उत्कर्ष नगर, चिंतामणी नगरी परिसरातील शालवन बुद्ध विहारात 73 वा संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख वक्ते म्हणून बसपा नेते व पालीचे अभ्यासक उत्तम शेवडे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून परिसरातील प्रसिद्ध सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्या ऋचा जीवणे ह्या होत्या. संविधान दिनानिमित्त शालवन विहार परिसरात घेण्यात आलेल्या स्पर्धेत साची चंदनखेडे व हर्षल भगत या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते विशेष बक्षीसे देण्यात आली.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना उत्तम शेवडे यांनी संविधान बनण्यापूर्वीचा फर्स्ट इंडिया अक्ट 1919, सेकंड इंडिया ऍक्ट 1935 व नंतरचा 1945 च्या संविधान सभेच्या निवडणुकीनंतर 1949 ला बनलेले भारतीय संविधान व त्यामागील सर्व प्रवासांचा धावता आढावा, संविधान बनल्या नंतरच्या 1952 व 1954 च्या लोकसभा निवडणुका व त्यातील बाबासाहेबांचा पराभव. त्याची कारण मिमांसा व आजच्या भारतीय संविधानाची प्रासंगिकता तसेच नवीन पिढीची संवैधानिक जबाबदारी यावर विस्तृत विवेचन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलताना ऋचा जीवने यांनी संविधानाने दिलेले मानवी कल्याणाचे समता, स्वातंत्रता, न्याय व बंधुतेवर आधारित संवैधानिक अधिकार व त्याची मुख्य वैशिष्ट्ये सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा बनकर यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी गायकवाड यांनी तर कार्यक्रमाचा समारोप नितीन वंजारी यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंबेडकरवादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवानंद वावरे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षवर्धन सोमकुवर, राजेश नितनवरे, अरुण मेश्राम, अनुराग रावळे, बंडू पंचभाई, शेखर कांबळे, रोशन वैरागडे, राजकुमार वानखेडे, शिशुपाल बनकर, रेखा वावरे, लोकमुद्रा सहारे, शुभांगी गायकवाड, निर्मला जीवने, रंजना नितनवरे, सीमा गणवीर, शंकर थुल, महिपाल सांगोळे, बेले साहेब आदींनी तसेच आंबेडकरवादी सखी मंचच्या महिला कार्य कर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामूहिक सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.