अभ्यासातील सातत्य व नियोजनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो – जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा : अभ्यासातील सातत्य, वेळेचे योग्य नियोजन , अभ्यासक्रमाची उजळणी व मेहनत करण्याची अफाट वृत्ती विद्यार्थ्यांनी ठेवल्यास नागरी सेवा परीक्षेत नक्की यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज नागपूर येथे केले.

जुन्या मॉरिस कॉलेज मधील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रसंचालक डॉ. प्रमोद लाखे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.

केंद्रीय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी हमखास यशस्वी होण्यासाठी असा कोणताही मूलमंत्र नाही. मात्र उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन व सातत्य हेच गुण विद्यार्थ्यांना यश मिळवून देतात . परीक्षेच्या दिवसांमध्ये अभ्यासाची करावयाची उजळणीचे नेमके वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच अपयश आल्यास कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला अपयश येत आहे त्याचा सांगोपांग अभ्यास व विश्लेषण करून विद्यार्थ्यांनी स्मार्ट पद्धतीने पुढील तयारी करावी असे, कदम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले .तसेच त्यांनी केलेल्या अभ्यासातील काही बारकावे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षा सोडून अन्य करिअर पर्याय सुद्धा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असे हि ते म्हणाले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निकिता घारपिंडे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सार्वजनिक गणेश मंडळातून निर्माल्य संकलनासाठी मनपाचे रथ सज्ज.

Wed Aug 31 , 2022
प्रत्येक झोनमध्ये एक रथ : बुधवारपासून संकलन कार्य सुरू : आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडी नागपूर : बुधवार ३१ ऑगस्टपासून सुरू होत असलेला गणेशोत्सव नागपूर शहरात पर्यावरणपूरकरित्या साजरा व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवश्यक ते सर्व कार्य करण्यात येत आहेत. या अंतर्गत गणेश मंडळ आणि घरगुती गणपतींचे निर्माल्य संकलन करण्यासाठी मनपाद्वारे ‘निर्माल्य रथ’ची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com