गडचिरोली :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गोकुलनगर व रामनगर गडचिरोली येथे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. सदर सेवांचा उद्देश म्हणजे स्त्री रोग उपचार, बालरोग उपचार, नेत्ररोग उपचार, कान-नाक-घसा रोग उपचार, मानसिक रोग उपचार, त्वचा रोग उपचार इत्यादी रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून विशिष्ट प्रकरच्या सेवा पुरविणे हा आहे. तरी या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील विशेष सेवांचा नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमास डॉ अमित साळवे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली, डॉ सचिन हेमके जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ रुपेश पेंदाम जिल्हा साथरोग अधिकारी, डॉ प्रफुल गोरे वैद्यकीय अधिकारी, डॉ सिमा गेडाम वैद्यकीय अधिकारी नागरी प्रा आ केंद्र गोकुळनगर, डॉ संघटित रायपुरे नागरी प्रा आ केंद्र गोकुलनगर उपस्थितीत होते. मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली सुर्यंकांत पिदुरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, लेखापाल, आशा स्वयंसेविका, यांच्या सहकार्यातून कार्यक्रम पार पडला.