मनपाची टिल्लू पंप धारकांवर जप्तीची कारवाई

– नळाचे मीटर काढुन सुरु होता पाण्याचा वापर

चंद्रपूर :- नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे.

मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. वैद्य नगर येथील शिवकृपा फर्निचर जवळील रहिवासी किशोर विठ्ठलराव रिधे,राजेश बागेल व सुरेश नत्थुजी इंगळे यांच्याद्वारे नळ जोडणीवर लावलेले जलमापक (मीटर) काढुन टाकणे तसेच टिल्लू पंप लावुन पाण्याचा अनावश्यक उपसा केला जात असल्याचे मनपा पथकास पाहणी दरम्यान आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.

सर्व नळ जोडणींवर मनपाद्वारे मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.

त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असुन नळावरील मीटर काढल्यास अथवा विद्युत पंप/ टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास मनपाच्या जप्ती पथकांद्वारे कारवाई केली जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षा सोहळ्याच्या वर्धापनदिनापूर्वी दीक्षाभूमी येथील स्टेजचे बांधकाम करा - भदंत ससाई यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

Thu Aug 22 , 2024
नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तनदिन, अशोक विजयादशमीच्या तीन आठवड्यांपूर्वी दीक्षाभूमी येथील मुख्य स्टेजचे संपूर्ण बांधकाम करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाठविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमीला दीक्षा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!