संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील विशेष दिवस कार्यक्रम समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. विशेष दिवस कार्यक्रम समिती व कार्यक्रम समन्वयक, इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या लोककल्याणकारी कार्यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यांचा गौरव केला. यावेळी उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवती, उपप्राचार्य डॉ.रेणू तिवारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इतिहास अभ्यास मंडळाचे सल्लागार डॉ. जयंत रामटेके, डॉ. नितिन मेश्राम, डॉ. इफ़्तेख़ार हुसैन, डॉ. तारुण्य मुलतानी, डॉ. अज़हर अबरार, डॉ. सतिश डूडूरे, डॉ. तुषार चौधरी, राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, एन. सी. सी. समन्वयक डॉ. मोहम्मद असरार, डॉ. इंद्रजीत बसु, डॉ. जयश्री ठवरे, डॉ. रेणुका रॉय, डॉ. रश्मी जाचक, डॉ. शालिनी चहांदे, डॉ. आशा रामटेके, डॉ. समृद्धि टापरे, ग्रंथपाल शिल्पा हिरेखन, गिरीश संगेवार, संतोष गुप्ता,मानवटकर, उमेश बांगर सहित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन विशेष दिवस कार्यक्रम समितीचे सदस्य डॉ. महेश जोगी तर धन्यवाद डॉ. विकास कामडी यांनी मानले.