नागपुर :- रथसप्तमीचे औचित्य साधून दिनांक 16 फेब्रुवारीला यशवंत स्टेडियम नागपूर येथे योगाभ्यासी मंडळ द्वारा भव्य सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विशिष्ट सेवा मेडल प्राप्त एअर व्हाईस मार्शल (से.नि.) विवेक राजहंस, मंडळाचे अध्यक्ष श्रद्धेय रामभाऊ खांडवे गुरुजी तसेच कार्यवाह मिलिंद वझलवार आणि योगाभ्यासी मंडळाच्या नागपूर येथील विविध केंद्राचे हजाराचे वर योगसाधक उपस्थित होते.
बरोबर सूर्योदयाच्या क्षणी 12 समंत्र सांघिक सूर्यनमस्कार सुरू झाले. त्या वेळी सूर्याला अरघ्य ( arghya) देऊन आदित्य हृदय स्तोत्राचे पठण झाले. त्यानंतर प्रमुख अतिथिंचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. त्याच वेळी 100चे वर साधक 144 सूर्यनमस्कार घालीत होते.
एअर मार्शल राजहंस यांनी आपल्या उदबोधनात सांघिकता, शिस्त महत्वाची असून त्यामुळे समाज बांधणी उत्तम होऊन राष्ट्र सबल होते हे अधोरेखित केले व सर्व नागरिकांनी शासनाने केलेले कायदे पाळणे, स्वच्छता राखणे आवश्यक आहे आणि योग शास्त्रही यम नियमाचे पालन करून हेच साध्य करते हे प्रतिपादित केले. खांडवे गुरुजींनी साधकांनी जनार्दन स्वामी यानी सुरू केलेले योगकार्य वाढविण्या साठी अनेक केंद्रे सुरू करण्याचे आवाहन केले.
तीर्थ प्रसादा नंतर कार्यक्रम संपला.