विविध देशांच्या मुंबईतील राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई :-विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व डीन ऑफ काॅन्सुलर कोर अँड्रिया कून तसेच कॉन्सुलर कोर संघटनेचे उपप्रमुख विजय कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात ३५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

सध्याचे युग हे परस्पर सहकार्याचे आहे. अश्यावेळी विविध देशांच्या प्रतिनिधींमध्ये सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे. भारताकडे जी – २० देशांच्या परिषदेचे यजमानपद आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशांचे भारताशी असलेले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. 

यावेळी सर्व प्रतिनिधींनी राजभवनातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तसेच क्रांतिकारकांच्या भूमिगत दालनाची पाहणी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com