संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक असुन महिला, शेतकरी, विद्यार्थी, कामगार, आदिवासी व मध्यमवर्गीयांना न्याय देणारा आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तरूणांना स्वावलंबी बनवण्याकरिता अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेली आहे. 7 लक्ष पर्यंत कर माफी हे सुध्दा मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे.