जिल्हा वार्षिक योजनेची प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करा – डॅा.पंकज आशिया

– जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा आढावा

यवतमाळ :- जिल्हा वार्षिक योजनेतून विभागांची विविध विकासविषयक कामे मंजूर केली जातात. त्यासाठी आर्थिक तरतूद देखील दिली जाते. विभागांनी मागील वर्षाची मंजूर आणि प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले.

महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर कामे व या कामांवर झालेला खर्च, या योजनांचे चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव, खासदार विकास कार्यक्रम, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर कामांची प्रगती व या सर्व योजनांवरील अखर्चीक निधीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांच्यासह सर्व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर निधी व कामे तसेच कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या विभागांची कामे अद्यापही प्रलंबित आहेत, त्यांनी ती तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश दिले. येत्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने कामे करण्यावर निर्बंध येतील, त्यामुळे कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

विकास कामे करतांना कामांचा प्राधान्यक्रम ठरविला पाहिजे. जी कामे तातडीने करणे आवश्यक आहे, अशी कामे आधी घेण्यात यावी. काम करतांना ती उत्तम दर्जाची असावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या तिनही उपयोजनांचा त्यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषदेला जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करायला दोन वर्षाचा अवधी असतो, असे असले तरी लवकरात लवकर कामे करून निर्धी खर्ची पाडण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला लोकशाही दिन 15 जुलै रोजी

Fri Jul 12 , 2024
यवतमाळ :- महिलांच्या तक्रार निवारणासाठी सोमवारी दि.15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनी जिल्ह्यातील तक्रारग्रस्त महिलांनी तक्रारी मांडव्या, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com