अमरदिप बडगे, प्रतिनिधी
“आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करणे हे विभागाचे उद्दिष्ट – विकास राचेलवार
गोंदिया :- जागतिक दर्जाच्या भविष्य वेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळांमधील प्राथमिक शिक्षक,पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षणाचे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कडीकसा येथे उद्घाटन प्रसंगी बोलताना आदिवासी विकास विभाग देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी शिक्षकांना आव्हान केले की आपल्याला आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अथक परिश्रम करणे अत्यंत आवश्यक असुन आदिवासी विद्यार्थी हा जागतिक दर्जाचा विद्यार्थी घडविल्यास क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली होईल व खरंच आपण जनजाती गौरव दिन साजरा केला असे म्हणता येईल,या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते चैनसिंग मडावी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनबोध कुमरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी हरीचंद सरीयाम, एस.आर.सोनेवाने, मुख्याध्यापक प्रभु कळंबे, प्रभाकर चोपकर, मदन भोवते, हरीभाऊ किरणापुरे, एकनाथ दुबे, नरेंद्र भाकरे, कमल कापसे,पोटे ,चांदेवार इत्यादी मुख्याध्यापक,शिक्षण विस्तार अधिकारी भुसारी, गाते ,नरेंद्र पाळेकर, देशमुख, सर्व विषयांचे सहसुलभक व प्रशिक्षणार्थी शिक्षक व विषयमित्र उपस्थित होते.
या प्रसंगी भगवान बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राला माल्यार्पन करून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते पुजा अर्चना करून प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले, भविष्य वेधी शिक्षण प्रणाली अंतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी उषा हजारे, मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना सरळ व सोप्या भाषेत कशाप्रकारे अध्यापन करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन नवखरे यांनी केले.