आयुक्तांनी केली श्रद्धानंद पेठ ते एलएडी चौक रस्त्याच्या कामाची पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे श्रद्धानंदपेठ ते एलएडी चौक दरम्यानच्या जवळपास ९०० मीटर मार्गाचा विकास केला जात आहे. याच विकास कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.३) पाहणी केली.

आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी पाहणीची सुरुवात अभ्यंकर नगर चौकापासून केली. एलएडी चौक ते अभ्यंकर नगर चौक दरम्यान अमृत-२ अंतर्गत पूर्ण झालेल्या पाईप लाईनच्या कामाची तसेच त्याच लांबीमध्ये सुरू करावयाच्या सीमेंट रोडच्या कामाची पाहणी केली. सदर लांबीमध्ये रस्त्याच्या ज्या बाजूला पाईप लाईन टाकण्यात आली आहे त्या भागातील रस्त्याची पुनर्स्थापना योग्यरित्या केली नसल्याने दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याचे मा. आयुक्त निदर्शनास आले होते. कंत्राटदारामार्फत रस्त्याची पुनर्स्थापना योग्यरित्या केली गेली नसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने नियोजन करून लवकरात लवकर रस्त्याची पुनर्स्थापना करण्याचे सक्त निर्देशही यावेळी दिले.

याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करताना त्या ठिकाणी सूचना फलक व काम सुरू केल्याची/काम पूर्ण होण्याची दिनांक नमूद करावे, कंत्राटदाराने स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लावावा. तसेच रस्त्याचे काम सुरू केल्यास रस्त्याच्या दोन्ही टोकावर योग्यरीत्या बॅरीकेट्स लावावे, आपले वाहतूक सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावे, असेही निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, लीना उपाध्याय, डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता विजय गुरुबाक्षानी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ?

Mon Jun 3 , 2024
नागपूर :- लोकसभा निवडणुकीचे बहुप्रतिक्षित निकाल मंगळवारी जाहीर होणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. मागील सव्वा महिन्यापासून निकालांबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. आता कुणाचे दावे खरे ठरले व कुणाचे आकडे हवेत विरले यावरुन पडदा हटणार आहे. साधारणत: दुपारनंतर कल लक्षात येणार असला तरी निकालाचे अंतिम आकडे हाती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com