संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील गोकुल दूध डेअरी समोर काल रात्री 11 वाजेदरम्यान प्रॉपर्टी व्यवसायिक देवा मोहोड नामक तरुणावर कासीम नावाच्या तरुणाने विटाने डोक्यावर मारझोड करून गंभीर जख्मि केल्याची घटना घडली असून जख्मि देवा मोहोड उपचारार्थ नागपूर च्या मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले तर यासंदर्भात जख्मि फिर्यादी देवा मोहोड वय 40 वर्षे रा रणाळा ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कासीम विरुद्ध भादवी कलम 324 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे करीत आहेत..