नागरिकांच्या तक्रारींबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश

– मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेकडे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात येणाऱ्या तक्रारीं संदर्भात हयगय करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. महानगरपालिकेच्या ‘ग्रेव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर प्राप्त तक्रारी सोडविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा स्वीकारला जाणार नाही, असेही त्यांनी बजावले.

मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक आयुक्त यांच्या सभाकक्षात शुक्रवारी (ता.३१) पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, विजय देशमुख, मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अग्निशमन विभाग प्रमुख बी.पी. चंदनखेडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सर्व सहायक आयुक्त, सर्व कार्यकारी अभियंता व माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्निल लोखंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता महानगरपालिकेने ऑनलाईन पोर्टल सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ महिन्यापर्यंत नागरिकांकडून महानगरपालिकेला ऑनलाईन स्वरुपात करण्यात आलेल्या तक्रारी तसेच झोन स्तरावर व विविध विभागानुसार करण्यात आलेल्या तक्रार निवारण प्रणालीची माहिती अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बैठकीत दिली. त्यांनी विविध विभागांकडे प्राप्त तक्रारीची माहिती दिली आणि त्या तक्रारी कोणत्या स्तरावर आहेत याची सुद्धा माहिती आयुक्तांना दिली. काही तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला आयुक्तांनी दिले. तसेच बैठकीमध्ये गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले. श्रीमती गोयल यांनी सांगितले की, मनपा तर्फे ०१ डिसेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत २६०५ तक्रारी चे निवारण करण्यात आले असून २३१२ तक्रारींवर नागरिकांचे मत प्राप्त झाले आहे.

झोनचे सर्व सहायक आयुक्त, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना ऑनलाईन स्वरुपात नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी सोडविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. याशिवाय ज्या भागातून तक्रार आली आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. झोन स्तरावर आलेल्या तक्रारीचा आढावा सतत घ्यावा. तक्रारीची योग्य दखल घेत नागरिकांना ऑनलाईन उत्तरे देण्यात यावीत, असे निर्देशही डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच तक्रार निराकरणाच्या दृष्टीने काम सुरु असल्यास त्याची माहिती देण्याचे ही निर्देश दिले. तक्रारींच्या संदर्भात निष्काळाजीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा सक्त इशारा आयुक्तांनी दिला. शिवाय अनेक तक्रारी दोन किंवा तीन विभागांशी संबंधित असल्यास अशा तक्रारी प्रत्येक विभागांद्वारे समन्वय साधून सोडविण्यात याव्यात,अशा सूचनाही त्यांनी आढावा बैठकीत दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भव्य नि:शुल्क रोग निदान शिबीराचा नागरिकांनी घेतला लाभ

Sat Feb 1 , 2025
कन्हान :- शहरात साई मंदिर जवळ महेंद्र साबरे मित्र परिवार, संह्यांद्री संस्था, लिंक वर्कर स्कीम नागपुर, दत्ता मेघे आयुर्वेदिक हाॅस्पीटल वानाडों गरी, रंजीत देशमुख डेंटल कॉलेज आणि सिटी हॉस्पीटल यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नि:शुल्क रोग निदान शिबीराचा बहु संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. इंदिरा नगर येथील कन्हान साई मंदिर जवळ महेंद्र साबरे मित्र परिवार, संह्यांद्री संस्था, लिंक वर्कर स्कीम नागपुर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!