नागपूर :- विधानभवन परिसराजवळील मीठानीम दरगाह येथे आला हजरत बाबा सैय्यद शाह जलालुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह यांचा २१३वा वार्षिक उर्स मंगळवार, ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे़ १० फेबु्रवारीपर्यंत चालणाऱ्या उर्स दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ ७ फेब्रुवारीला राजे मुधोजीराव भोसले आपल्या हातांनी येथे मजारवार चादर व फूल चढवतील़ बुधवारी सायंकाळी ६ वाजता सज्जादानशीन मोहम्मद निजामुद्दीन खान कादरी यांच्यातर्फे दरबारी शाही संदल काढण्यात येईल़ शहरातील विविध मार्गावरून होत हा संदल पुन्हा दरगाह परिसरात पोहोचेल़ सहाही दिवस सकाळी पवित्र कुरआनचे पठन व सायंकाळी धार्मिक कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे़ १० फेबु्रवारीला सकाळी ११़३० वाजता ‘कुलशरीफ’ची ‘फातेहा’ व नंतर महाप्रसाद वितरीत केला जाईल़ सर्वधर्मियांनी या उर्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन सज्जादानशीन मोहम्मद निजामुद्दीन खान कादरी यांनी केले आहे़.