संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,राजीव गांधी सभागृह,घरकुल योजना,आदी समस्याच्या विषया संदर्भात कांग्रेस तर्फे कामठी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला घेराव करीत समस्याचे लवकरात लवकर निदान करण्याहेतु मुख्याधिकारी संदीप बोरकर ला सामूहिक निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सध्या शहरात साथ रोगाची लागण झाली असून मलेरिया,डेंग्यू यासारख्या विविध आरोग्यांनी नागरिक ग्रासले आहेत त्यातच नगर परिषद तर्फे होणारा दूषित पाणी पुरवठा तर कुठे पाणी पुरवठ्यात होत असलेला खंडित समस्यांमुळे नागरिकांना नाकीनऊ आले आहे.शहरात फिरणारे घंटा गाडी नियमित फिरत नसणे ज्यामुळे कचरा समस्या उद्भवली आहे.राजीव गांधी सभागृहाची डागडुजी करून नागरिकांच्या विविध सांस्कृतिक ,सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणणे,गांधी मंच परिसराला सुरक्षित करुन सौंदर्यीकरण करणे,नागरिकांना आखीव पत्रिका वितरित करणे,कामठी शहरातील खाजगी इस्पितळा समोर पार्किंग ची सुव्यवस्था करणे,छत्रपती शिवाजी पुतळा चे अनावरण फलक चा शोध घेऊन अनावरण फलक पुतळ्याच्या पूर्ववत ठिकाणी लावणे,हॉकर्स झोन कार्यान्वित करणे,चौका चौकात हायमास्ट लाईट लावणे आदी विषयावर चर्चा करून सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना कांग्रेस शहराध्यक्ष रमेश दूबे,कांग्रेस पदाधिकारी माजी नगराध्यक्ष शकुर नागानी,जी प सभापती अवंतिका लेकुरवाडे,माजी नगराध्यक्ष नीरज यादव,माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर,माजी नगरसेवक मो अर्षद,लक्ष्मण संगेवार, राजकुमार गेडाम,नितेश यादव, तोषल आमधरे,विनोद शर्मा, सुरेश ढोरे,आसिफ सिरमीर्तीया,मोहम्मद अक्रम, मोहसीन अख्तर, अमीन रशीदी,फैजल नागांनी,संदीप जैन,अभिषेक चिमनकर,मोहम्मद शफीक,प्रकाश लाईनपांडे,तौसिफ फैजी, तौसिफ खान,शाहीन शेख,अमित नागदेवें,आदी कार्यकर्ता गण उपस्थित होते.