सलाई आणि घोगरा महादेव नदीच्या काठावरील गावाच्या परिसरात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय , भारत सरकार , तर्फे स्वच्छता मोहिमेचे केले आयोजन

पारशिवनी :- राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय ( क्षेत्र संचालन विभाग ) , नागपुर यांनी तालुकाचे गावात स्वच्छता मोहीम आयोजित केली. यात सलाई आणि घोगरा महादेव (पारशिवनी) येथे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ( क्षेत्र संचालन विभाग ), सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय , भारत सरकार , नागपूर यांनी पारशिवनी तहसील अंतर्गत ग्राम सलाई आणि घोगरा महादेव नदीच्या काठावरील गावाच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते .

ही विशेष मोहीम 02 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे . या मोहिमेचा शुभारंभ विभागीय कार्यालय , नागपूरचे उपमहासंचालक राजेंद्र सी.गौतम आणि संचालक श्रीनिवास उप्पाला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील सरपंच भुजंग ठाकरे, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व सलाई गावातील नागरिक मोठी संख्योत उपस्थित होते.

त्यांना स्वच्छता कार्यक्रमाच्या उद्दिष्टांबाबत प्रबोधन करण्यात आले व गाव परिसर व नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली . यानंतर गावाच्या स्वच्छतेबरोबरच प्राथमिक शाळेतील मुलांसोबत प्रभातफेरीचेही आयोजन करण्यात आले. यावेळी या स्वच्छता मोहिमेत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून श्रमदान करण्यात आले . या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनीही उल्लेखनीय योगदान दिले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वर में लेट लतीफी से हो रही उपभोक्ताओं को परेशानी

Wed Oct 26 , 2022
नागपुर :- रियासद में राशन कार्ड धारकों को दीपावली से पहले राशन की किट देने का फैसला लिया गया,लेकिन इस पर अमल बहोत देर में हो सका । सर्वर की धीमी गति ने सरकार की इस योजना पर पानी फेरने का ही काम किया है। महाराष्ट्र रियासत की सरकार ने इसी माह यानी अक्तूबर की 4 तारीख को निर्णय लिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com