प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) जास्तीत जास्त सक्रिय असणे आवश्यक  – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह

मुंबई :- प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्यावत असणे आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी आज व्यक्त केले.

आज महिला, बाल अत्याचार, प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांची अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या सदस्य ॲड. निलिया चव्हाण उपस्थित होत्या.

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह म्हणाल्या की, मुली व महिला बेपत्ता होण्याच्या घटना होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्ती जास्त सक्रिय व अद्यावत असणे आवश्यक आहे. या युनिटच्या कामकाजाचा अहवाल व त्यावर देखरेख याबाबत भेटीदरम्यान विस्तृत चर्चा करण्यात आली.लहान मुली आणि महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी आयोगाने माहितीपर पोस्टर्स तयार केलेले असून,हे पोस्टर सर्व पोलीस स्थानकात लावण्यासाठी त्याची प्रत आयोगामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आली.

विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे म्हणाले की, या विषयाबाबत सविस्तर अहवाल ते आयोगास सादर करतील. आयोगातील पोलीस विभागाशी संबंधित सर्व प्रकरणे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयामार्फत प्राधान्याने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पांडे यांनी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com