संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून एकत्र येऊन विविध सण -उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करून राष्ट्रीय एकता निर्माण करण्याचे आव्हान शीख धर्मगुरु ग्यानीजी हरपितसिंग यांनी मज्जिद इब्राहिम बीबी कॉलनी न्यू येरखेडा च्या वतीने आयोजित ईद -मिलन समारोहात मार्गदर्शन करताना व्यक्त केले मज्जिद इब्राहिम बीबी कॉलनी न्यू येरखेड्याच्या वतीने ईद मिलान समारोह आयोजित करण्यात आला होता ईद मिलन समारोहाला कन्टोन्मेंट कामठी येथील गुरुद्वाराचे शीखधर्म गुरु ग्यानीजी हर्पितसिंग ,भंते भदंत बौद्धरत्न संबोधित महाथेरो ,जैन धर्माचे युगचंद छल्लाणी , मुफक्ती आणिक जकी , येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच सरिता रंगारी ,उपसरपंच मंदा महल्ले पाटील, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी ,माजी सरपंच मनीष कारेमोरे ,ग्रामपंचायत सदस्य सतीश दहाट, रनाळा ग्रामपंचायतचे सदस्य प्रदीप सपाटे ,उमेश महाले ,ईश्वरसिंग चौधरी ,राजेंद्र चौरे सर, कुबेर महल्ले,अश्फाक अहमद ,प्रा डॉ अब्रार, प्रा डॉ रियजुलखलीक सर, डॉ तलत अन्सारी, साजिद खान ,अब्दुल अलीम ,जाहीद अन्वर ,सज्जाद सलीम ,वाशिम भाई ,मुनीर झाकी, तनवीर झाकी, तारीख ,अब्दुल रहीम ,रासमराज, मोहम्मद आकीब उपस्थित होते. कार्यक्रमात भन्ते भदन्त बौद्धरत्न संबोधित महातेरो ,जैन धर्माचे रूपचंद छल्लाणी, सरपंच सरिता रंगारी ,उपसरपंच मंदा महल्ले पाटील ,माजी सरपंच मनीष कारेमोरे यांनी विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून विविध सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून राष्ट्रीय एकता निर्माण करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.