महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत बाडकर यांच्यासह या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती दिली. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तत्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तटरक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१ ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम स्वच्छता अभियान ‘लोकचळवळ’ व्हावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Sep 26 , 2023
– राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ मुंबई :- स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com