संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून आगामी रमजान ईद, हनुमान जयंती,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ,राम नवमी विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी राम मंदिर चौक परिसरात पोलीस प्रशासनाचे वतीने आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले . आगामी रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व 19 एप्रिला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान विविध जाती धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे सोबतच 19 एप्रिला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणताही अपप्रचार व दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, सोबतच शहरातील अवैध धंदे महिला वरील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण, सायबर गुन्हे याबद्दल कोणत्याही नागरिकाला माहिती असली तर त्यांनी ताबडतोब पोलीस प्रशासनाला द्यावी त्यावर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले .सभेला पोलीस उपायुक्त निकेतन कदम ,सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षिरसागर ,जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे ,नवीन कामठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युनूस मुलांनी, रेखा संकपाळ ,पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ राखुंडे ,किशोर मोतींगे , गीता रासकर, मनीषा जाधव , शैलेश यादव ,सुचित गजभिये ,अखिलेश ठाकूर, अंकित ठाकूर, शहरातील गनमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेचे प्रास्ताविक जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी केले सर्व संचालन शैलेश यादव यांनी केले व आभार प्रदर्शन अखिलेश ठाकूर यांनी मानले.