नागपूर :- शहर (जिल्हा) महिला काँग्रेस कमिटी तर्फे सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ व्हेरायटी चौक,सीताबर्डी ,नागपूर येथे शहराध्यक्ष ॲड. नंदा चंद्रभान पराते ह्यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारचा 10 वर्षातील महिला आरक्षण विरोधी , ओबीसी जनगणना विरोधी ,वाढती महागाई संबंधी व निवडणुकीत महिलांना आरक्षण मिळावे म्हणून नारे- निर्दशन आंदोलन करण्यात येत आहे . साधारण माणसाला जगणे कठीण झाले आहे, हया विविध मागण्यांचे विरोधात नारे निदर्शनं आंदोलन करण्याकरिता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शहर महिला काँग्रेस चे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संगीता उपरीकर,उषा कुमरे,चारुलता भट,मीना गायकवाड, शकुंतला वट्टीघरे,जयश्री धार्मिक,अनिता हेडाऊ यांनी केले आहे.
महिला काँग्रेसचे दिनांक २९ जुलै २०२४ रोजी आंदोलन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com