जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक, जिल्हा वाहतुक शाखा नागपुर ग्रामीणची धडक कारवाई  वाहनासह एकूण १९८६०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये अवैध धंदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करणेबाबत जिल्हा वाहतुक शाखेचे पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना भंडारा नागपूर रोडनी दिनांक ०५/०५/२०२३- ये सकाळी ०५.०० वा. दरम्यान जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस पथक पेट्रोलींग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंडून कत्तलीकरीता वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करून पांढन्या रंगाची महींद्रा बोलेरो पिकअप क्र. एम. एन-३६ / एए-३२४२ क्रमांकाच्या वाहनाला थांबवून तपासले असता सदर वाहनात आरोपी क. १) रोहीत रमेश गभणे, वय २३ वर्ष व त्याचा साथीदार नामे २) श्रीकांत तुळशीराम नगरकर, वय २५ वर्ष, दोन्ही रा. लाखनी जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातून १३ नग बैल (गोवंश) जनावरे किमती अंदाजे १,२२,०००/- रु. तसेच पांढया रंगाची बोलेरो पिकअप क्र. एम. एच-३३ / जि. – २०२० या क्रमांकाच्या देखील वाहनाला थांबवून तपासले असता सदर वाहनात आरोपी क्र. १) अनिल अरूण ठवकर, वय २७ वर्ष, २) निलेश उर्फ आकाश हरीश हुमणे, वय २७ वर्ष, दोन्ही रा. नांदोरा जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातुन ८ बैल (गोवंश) जनावरे किमती अंदाजे ६४,०००/-रू असे एकुण २१ बैल (गोवंश) जनावरे एकुण किमती अंदाजे १८६०००/-रू जनावरे निर्दयतेने वाहतुक करतांना मिळुन आले. आरोपीतांकडुन वाहनासह असा एकूण किमती १९८६०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी नामे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मस्कर, जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे वरील आरोपीविरुध्द कलम ११ (१) (ड) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा १९६०, सहकलम ५(१) (२, ९ महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९१५, सहकलम ११९ महा. पोलीस अधि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील सर्व आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन मौदा करीत आहे.

सदरची कारवाई ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक विजय माहुलकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मस्कर, सहायक फौजदार सुधीर यादव, पोलीस नायक प्रणय बनाफर शिपाई कार्तिक पुरी जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Sat May 6 , 2023
कन्हान :- मे २०१६ ते आक्टोवर २०२२ दरम्यान यातील आरोपी नामे- मनोज शेन्डे वय ३९ वर्ष रा संताजी नगर कन्हान याने फिर्यादी / पिड़ता वय ३२ वर्ष हिला मे २०१६ मध्ये फिर्यादी ही आरोपी याचे राहते घरी पाणी पाउच कंपनी मध्ये कामाला होती तेव्हा सदर आरोपीने फिर्यादी हिला म्हटले होते की तु मला खुप आवडते असे म्हणून फिर्यादी सोबत मैत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com