परिमंडळ क. ५ अंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतुन मिसींग मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम संपन्न

नागपूर :-शहरात मोबाईल गहाळ तसेच चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस उप आयुक्त परि क. ५. यांनी त्यांचे परिमंडळा अंतर्गत येणारे पोलीस ठाणे मध्ये मोबाईल शोध पथके तयार करून सायबर पथक व तांत्रीक तपास करून मोबाईल शोधण्यासाठी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे कळमणा येथे ४५, पारडी ०८, नविन कामठी ०५, जुनी कामठी ०३, यशोधरानगर १०, कपिलनगर १७, जरीपटका ०९ व कोराडी ०३, अशा एकूण १०० गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला.

दिनांक ०८.१०.२०२४ रोजी निकेतन कदम पोलीस उप आयुक्त परि. क. ५, यांचे हस्ते एकुण १०० मुळ मोचाईल मालकांना त्यांचे मोवाईल एकुण किंमती १६,०२,५०३/- रू. किंमतीचे हस्तांतरण करण्यात आलेले आहे. मोबाईल प्राप्त झालेल्या लोकांनी समाधान व्यक्त करून पोलीसांचे मनःपूर्वक आभार मानले.

वरिल कामगिरी निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि. क्र ५), नागपूर शहर, विशाल क्षिरसागर, सहा. पोलीस आयुक्त (जरीपटका विभाग) नागपूर शहर, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे परि. क. ५ व पोलीस अंमलदार आशिष पिपरहेटे, सचिन टांगले, धनराज उमरेडकर, प्रमीत गुप्ता, रामचंद्र कौरती, राहुल कनोजीया, विजय गाते, सुर्यकांत सांभारे, मपोअं, गौरी हेडाऊ व लक्ष्मी रामटेके यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, ०२ गुन्हे उघडकीस

Thu Oct 10 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ३२, मिसाळ ले-आउट, जरीपटका, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विशाल पंजाबराव ठवडे, वय ४० वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह कार्यकमा करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दाराचे कडी कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख १३,५००/- रू. सोन्याचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे ५६,०००/- रू. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com