मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज रविवारी दुपारी ४.३५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले.

गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी ते आले होते. सायंकाळी रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत.

नागपूर विमानतळावर त्यांचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी,जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी मंत्री दीपक सावंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी रामटेक येथील गड मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या नेहरू मैदानावरील शिवसंकल्प अभियान या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.रात्री उशिरा ते मुंबईकडे प्रयाण करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून एमओए पुरस्कारांची घोषणा

Mon Feb 12 , 2024
पुणे :- राष्ट्रीय क्रीडा पातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडू आणि संघटनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय आता राज्य सरकारबरोबर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून घेण्यात आला असून, या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेने एमओए क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com