राष्ट्र नेता ते राष्ट्र पितामह जन्म दिवस सेवा पंधरवाडा उत्साहात

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- तिरोडा तालुका भारतीय जनता पक्ष अतंर्गत प्रत्येक गावात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसा पासून सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात तिरोडा गोरेगाव चे आमदार विजय राहंगडाले यांच्या नेतृत्वाखाली खाली करण्यात आली व तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे यांच्या अध्यक्षतेखाली सेवा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात सर्व प्रथम वुक्षारोपण नवरगाव गांगला,परसवाडा, कोडेलोहारा, सोनेगाव, बेरडीपार,डोगंरगाव, बोदा, अर्जुनी, नवेगाव,वडेगाव, ठाणेगाव,  सिल्ली,केसलवाडा,तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे कोव्हिड बुसटर डोज लसीकरण करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवनावर प्रदर्शनी, पंतप्रधान कल्याणकारी योजना व प्रशासकीय पुस्तक चा प्रचार प्रसार, रक्त दान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर, दिव्यांग कार्यक्रम व सहकार्य, टि बी चे रुग्ण एक वर्षासाठी दत्तक, बुस्टर डोज प्रचार प्रसार व केद्रांवर स्टाल, स्वच्छता अभियान, जल संरक्षण जल हेच जिवन एक भारत श्रेष्ठ भारत संदेश व उत्सव स्पर्धा आयोजित, आत्मनिर्भर भारत प्रोत्साहन, बुध्दिजिवी,सम्मेलन, केंद्र सरकारच्या योजना लाभार्थी कडून पंतप्रधान यांना शुभेच्छा अभिनंदन पत्र, दिनद्याल जंयती गांधी जयंती साजरी करण्यात आली.या साठी संयोजक ॲड. माधुरी रांहगडाले,मदन पटले,रविंद्र वहिले,डॉ. रामप्रकास पटले,दिनेश पटले,डॉ शिशुपाल पटले,डॉ. चैतलाल भगत,मनोहर बुध्दे, तुमेशवरी बघेले, रजंनी कुंभरे,हुपराज जमईवार, चत्रभुज बिसेन, डॉ. बि एस राहगंडाले,कुंता पटले, प्रविण पटले,जितेंद्र रांहगडाले, तिरुपती राणे, यांनी जवाबदारी पार पाडली. सुंनदा पटले,ज्योती शरनागत, प्रमीला भलाई, दिपाली टेभेकर, तेजराम चौव्हान, कवीता सोनेवाने,डॉ वसंत भगत,चिंतामन राहगंडाले, सर्व पदाधिकारी उपस्थित राहून सहभागी झाले. सर्व प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांनी सेवा पंधरवाडा आयोजित करून माहिती दिली सहकार्य केले वैद्यकीय अधिकारी डॉ आदित्य दुबे, संगीता भोयर,डॉ हरीनखेडे,कांचन रहागंडाले,सर्व उप केद्रांचे सि एच ओ. यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. व तिरोडा गोरेगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार विजय रांहगडाले यांनी सेवा पंधरवाडात सहकार्य केलाबदल अभिनंदन केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com