चिकन मटण विक्रेत्याचा लुबाडणुकीचा प्रयत्न फासला

– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 26:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोयल टॉकीज चौकातून स्वतःच्या दुचाकीने घरी जात असलेल्या एका चिकन मटन विक्रेत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून , त्याला मारझोड करीत त्याच्याकडे असलेली पैस्याची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची घटना काल रात्री साडे 10 दरम्यान घडली मात्र वेळीच भीतीपोटो या मटण विक्रेत्याने मदतीची याचना करीत मोठ्याने आरडा ओरड केल्याने आरोपीने त्वरित घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठल्याने व्यापाऱ्यांची लुबाडणूक होण्याची अनर्थ घटना टळली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल शुक्रवार आठवडी बाजार असल्याने नेहमी प्रमाणे चिकन मार्केट मध्ये ताज चिकन मार्केट नामक दुकानदाराने दिवसभराचा मटण विक्री चा व्यवसाय करून रात्री साडे दहा दरम्यान दुकान बंद करून पैस्याची बॅग सोबत घेऊन स्वतःची दुचाकी स्प्लेडर क्र एम एच 40 व्ही 4209 ने गोयल टॉकीज मार्गे राहत्या घरी नया बाजार कडे जात असता नजर ठेवुन असलेल्या एका आरोपी ने गोयल टॉकीज चौकातील ए टू झेड रेडिमेड दुकानासमोर सदर चिकन मटण विक्रेत्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारझोड करून त्याच्या हातात असलेली पैस्याची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मटण विक्रेत्याने आरडा ओरड केल्याने आरोपीने घटनास्थळहून पळ काढण्यात यश गाठले परिणामी लुबाडणुकीची घटना टळली.यासंदर्भात फिर्यादी ताज चिकन मार्केट चे विक्रेता नियाज अहमद शेख फरीद वय 56 वर्षे रा नया बाजार कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 394 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर या चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रफितीत अज्ञात आरोपी चे व्यक्ती वर्णन कैद करण्यात आले असून आरोपी हा पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट परिधान करून आहे तसेच आरोपीने घटनास्थळावर आपले पायातील चप्पल सोडून पळ काढला हे इथं विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ज्ञान स्मरण शक्ति बढ़ाने के लिए रामबाण औषधि है ब्राह्मी बूटी.

Sat Feb 26 , 2022
-टेकचंद शास्त्री नागपुर –  आयुर्वेद लाखों-करोड़ों सालों से प्राचीनतम् ऋषियों मुनियों और संत महात्माओं सहित भारतीयों जन मानस को हर तरह से स्वस्थ रखने और जड से बीमारी दूर करने में मददगार रहा है। आयुर्वेद ने अनगिनत वर्षों की इस संसारिक यात्रा के दौरान विहंगम वनों में विभिन्न प्रकार की जड़ी बूटियों और वनस्पतियों में पाए जाने वाले औषधीय गुणों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights