भंडारा :- महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा, जिल्ह्यास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा येथे 14 ऑक्टोंबर रोजी जे.एम.पटेल महाविद्यालय भंडारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 57 इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 34 उमेदवारांनी आपल्या नवसंकल्पनांचे सादरीकरण केले. त्यापैकी प्रथम मुकेश बिसने, द्वितीय आकाश खेडीकर व तृतीय प्राची बागडे या तीन उमेदवारांची जिल्हास्तरीय निवड करण्यात आली. सदर जिल्हास्तरीय निवड झालेल्या उमेदवारांचे बक्षीस वितरण उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.
सदर प्रसंगी मोरे यांनी यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या नवसंकल्पना जिल्ह्यातील तसेच संपूर्ण देशातील नागरिकांना उपयोगी पडून लोकांचा श्रम, पैसा, वेळ वाचेल यादृष्टीने कार्य करावे उद्देशून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, कौशल्य विकास अधिकारी भाऊराव निबांर्ते, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुहास बोंदरे हे उपस्थित होते.