नागरिकांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्षात 24 नोव्हेंबरपर्यत पुरावे सादर करावे

भंडारा :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी शासनाव्दारे मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच, शासन निर्णयान्वये या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे

त्यानुषंगाने, जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. जुनी अभिलेखे समितीस संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात दि. 21.11.2023ते दि.24.11.2023 या कालावधीत सादर करावीत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असुन उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांची नियुकती या कामासाठी करण्यात आली आहे.तरी नागरिकांनी कुणबी असल्याबाबतचे वर नमुद पुरावे या कक्षात 21 ते 24 नोव्हेंबरपर्यत सादर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

NewsToday24x7

Next Post

महारेशीम अभियान 2024 रेशीम उद्योग करण्यास इच्छूक नवीन शेतकऱ्यांच्या नोंदणीस सुरुवात.”

Sat Nov 18 , 2023
भंडारा :- रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणा-या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतक-यांना माहिती व्हावी याकरीता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच सन 2024 मध्ये रेशीम उद्योग करण्याकरीता इच्छूक लाभार्थींची नाव नोंदणी करण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत महारेशीम अभियान -2024 राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सदर अभियान भंडारा जिल्हयात सुध्दा राबविण्यात येत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com