खेडी येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिकावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- केंद्रीय राखीव पोलीस दल धानोरा गडचिरोली येथे कार्यरत असलेले खेमराज डोमाजी वानखेडे वय 59 यांचे अल्प आजाराने निधन झाले असता त्यांचे मूळ गावी खेडी तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कामठी तालुक्यातील खेडी येथील खेमराज डोमाजी वानखेडे हे सण 1985 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात देश सेवेसाठी भरती झाले होते त्यांनी महाराष्ट्र ,आंध्र प्रदेशात विविध ठिकाणी कार्य करून देशाची सेवा केली ते केंद्रीय राखीव पोलीस दल धानोरा जिल्हा गडचिरोली केंद्रात कार्यरत करीत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने अल्पशा आजाराने त्यांचे रविवारला निधन झाले.

निधनाची वार्ता खेडी गावात पसरतात गाव शोक मग्न झाले होते खेमराज वानखेडे यांचे पार्थिव केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने त्यांचे मूळ गावी खेडी कामठी तालुका येथे सोमवारला दुपारी दोन वाजता सुमारास आणण्यात आले त्यादरम्यान खेडी परिसरात विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.खेडी येथील स्मशानभूमी सीआरपीएफ सेंटर नागपूर 113 बटालियनचे कमांडंट यांचे मार्गदर्शनात खेमराज वानखेडे यांच्या पार्थिवावर तिरंगा झेंडा अर्पण करून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वतीने मानवंदना देण्यात आली .खेमराज वानखेडे यांचा मुलगा ऋग्वेद यांनी मुखाग्नी दिली. विविध राजकीय पक्षाचे नेते व गावकऱ्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडर यांनी श्रद्धांजली अर्पण केली मृतक पोलीस सैनिक यांचे मागे पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कंटेनर मधून गोवंश जनावराची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीस अटक

Tue Oct 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -पोलिसांनी दिले 45 जनावरांना जीवनदान, चाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त कामठी :- कंटेनर मधून अवैधरीत्या गोवंश जनावराची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय दोन तस्करास नवीन कामठी पोलिसांनी नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील लिहीगाव शिवारात अटक करून 45 जनावरांना जीवदान दिले असून 40 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सोमवारला दुपारी तीन वाजता सुमारास केली. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com