शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जागतिक परिचारिका दिवस साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16: – आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस 12मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो .याच पाश्वरभूमीवर (आज12मे) ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 10 वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ , डॉ शबनम खाणुनी यांच्या मुख्य उपस्थितीत आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत केक कापून जागतिक परिचारिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ शबनम खाणुनी यांनी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकीत आपले विचार व्यक्त करीत समस्त परिचरिकाना आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी, यासह आरोग्यसेविका सुमित्रा वाघधरे , रंजना कवरती, स्वाती भवसागर, नीलम खोब्रागडे, सुनीता तिजारे, सीमा नगरारे तसेच कर्मचारी गन उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दहा दिवसीय विश्व शांती धम्मदेसना कार्यक्रमाचा समारोप

Mon May 16 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 16:-आजच्या वर्तमान स्थितीत जगावर युद्धाचे सावट पसरले आहे या परिस्थितीतून समस्त मानव जातीला जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांचे विचारच या बिकट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात.वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण विश्वात शांतता स्थापित व्हावी, बुद्धांचे विचार पुनःश्च अंगीकृत केले जावे आणि मानव सदमार्गाला लागावा म्हणून भारतीय बौद्ध महासभा कामठी शाखा, समता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com