नागपूर :- भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव महावितरणतर्फ़े उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’ मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन देखील यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता हरिष गजबे, राजेश नाईक, मंगेश वैद्य, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रांजली कोलारकर, प्रदिप सतपुते, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, प्रतिक्षा शंभरकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीचे अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.