महावितरणमध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा

नागपूर :- भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव महावितरणतर्फ़े उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’ मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन देखील यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता हरिष गजबे, राजेश नाईक, मंगेश वैद्य, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रांजली कोलारकर, प्रदिप सतपुते, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, प्रतिक्षा शंभरकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीचे अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रशिक्षण कार्यशाळेस अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस 

Wed Jan 31 , 2024
– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश नागपूर :- मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाच्या अनुषंगाने कर्मचा-यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यशाळेस अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावे असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. मराठा समाज आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com