विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- सन २०२२ ते दिनांक १५.०६.२०२३ चे १९.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे धंतोली हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय फिर्यादी महिला हीला ओळखीचा आरोपी नामे महेश राजु वानखेडे वय २३ वर्ष, रा. धंतोली, नागपूर याने फिर्यादीला विनाकारण फोन करून तसेच मॅसेज करून फिर्यादी हीचा पाठलाग करीत होता आरोपी हा फिर्यादीस बोलण्यासाठी जबरदस्ती करीत होता. तसेच आरोपीने फिर्यादीस पोलीस ठाणे धंतोली हद्दीत माझे सोबत लग्न कर असे जवरदस्ती करून लग्न न केल्यास फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ करून पाहुन घेण्याची धमकी देवून फिर्यादीचे पतीला मारण्याची धमकी दिली. व आरोपीने फिर्यादीचे मनास लज्जा येईल असे अश्लील कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे धंतोली येथे पोउपनि गाठे यांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४(ड), २९४, ५०६ भादंवी कायदाअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

NewsToday24x7

Next Post

प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

Mon Nov 6 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत विनोबाभावे नगर  कळमणा पुलाकडे पायदळ जाणारे देवदास गुलाबराव धेटे वय ४० वर्ष रा. कुंदनलाल गुप्ता नगर, यशोधरानगर यांना रोड क्रॉस करीत असता आरोपी एका लाल रंगाचे कार चालकने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक मारून गंभीर जखमी करून पळून गेला. जख्मी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल वार्ड क्र. ३९ येथे दाखल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com