नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर शहरातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या असून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
दिवाळीत फटाके वाजविताना ते जास्त आवाज करणारे आणि जास्त धुर सोडणारे नसावेत याची काळजी घ्यावी. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. सण साजरा करताना पर्यावरणाचा विचार अवश्य करा. खूप जास्त आवाज आणि जास्त धूर यामुळे पर्यावरणाचा संतुलन बिघडतो शिवाय प्राण्यांना इजा पोहोचते. आपल्या परिसरात, जवळपास स्वच्छता रहावी, ही देखील आपली जबाबदारी आहे. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना आपल्या जबाबदारीचा विसर पडू देऊ नका पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, असे देखील आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.