नागपूर :-दिनांक ११.०५.२०२३ रोजी मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधीश पि.वाय लाडेकर यांनी त्यांचे कोर्टाचे केस के ११९/२०१६ मधील पो. ठाणे हिंगणा येथील अप.क्र. १०८/२०१५ कलम ३०७, ३४ भा.दं.वि. या गुन्हयातील आरोपी २) पांडुरंग उर्फ पांडु मेघराज जाधव वय ३४ वर्ष, २) प्रकाश मेघराज जाधव वय २७ वर्ग दोन्ही रा. मेटा उमरी, हिंगणा, नागपूर याचे विरुद्ध साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत झाल्याने दोन्ही आरोपींना कलम ३०७ भा.दं.वि मध्ये ४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व १०,०००/ रु दंड व दंड न भरल्यास ०६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
दिनांक १३.०९.२०१५ चे ११.०० वा ने सुमारास फिर्यादी शकुंतला राजु चव्हाण वय ३० वर्ष रा. वार्ड क. १. लभान मोहल्ला, मेटा उमरी, हवा त्यांचे घरा समोर अंगणात झाडू मारीत असतांना यातील आरोपी १) पांडुरंग उर्फ पांडु मेघराज जाधव वय ३४ वर्ष, २) प्रकाश मेघराज जाधव वय २७ वर्ष दोन्ही रा. मेटा उमरी, हिंगणा ३) तेजराम उर्फ तेजु अटलसिंह जाधव वय ३१ वर्षं रा. पुसागोंदी, तांडा हे तिचे घरासमोर दारूची विक्री करीत होते. फिर्यादीचा भाउ कैलास सरीलाल जाधव वय २५ वर्ष याने आरोपींना दारू विक्री करण्यास मनाई केल्याचे कारणावरून आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचे भावास जिवे ठार मारण्याचे उद्देश्याने डोक्यावर लोखंडी कुन्हाडीने मारून गंभीर जखमी केले. फिर्यादी हिने दिलेल्या रिपोर्ट वरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना दिनांक १४.०९.२०१५ रोजी अटक करण्यात आली होती. यातील आरोपी क. ३, याचा एम.सी.आर दरम्यान कारागृहात मृत्यु झालेला आहे.
सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी तत्कालीन पोनि विलास शंकरराव वादीले यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अँड. मदन सैनाड यांनी काम पाहिले तर आरोपी तर्फे अॅड. अजय मदने यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोहवा दिलीप मंडल, यांनी काम पाहिले.