मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
– वेकोलि सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचारी ची कारवाई.
कन्हान (नागपुर) : – वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत इंदर खुली कोळसा खदान येथील कोळसा चोरून मारोती व्हँन मध्ये भरून नेताना वेकोलि सुरक्षा अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यानी पाठलाग करून टेकाडी येथे पकडुन व्हँन, कोळसा सह ३४००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी आकाश इंगळे विरूध्द कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला.
वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा प्रभारी रविकांत रामदास कंडे वय ४५ वर्ष हे कर्तव्यावर असताना (दि. २८) फेब्रुवारी ला २ वाजता दरम्यान टेकाडी गावाकडे एक मारोती व्हॅन कोळसा भरून निघाल्याची गुप्त सुचने व्दारे माहीती मिळाल्याने सहकारी फराज इस्ते खार अहमद वय २२ वर्ष मु वारीसपुरा कामठी यास सोबत घेऊन निघालो असता टेकाडी गावाकडे हँन सामोर जाताना दिसल्याने तिचा पाठलाग करुन महाजन नगर टेकाडी मंदिर जवळ व्हँन थांबविले असता पुर्णपणे दगडी कोळश्याने भरलेली दिसली. विचारपुस केली असता आरोपी आकाश बहुजी इंगळे वय २८ वर्ष मु. साई मंदिर वार्ड २ टेकाडी याने इंदर खुली कोळसा खदान डम्मिंग यार्ड येथील कोळसा चोरून आणला असल्याने सांगितले. मारोती व्हॅन क्र एमएच ३१ ए एच २० – २०३९ मधिल कोळश्याचे वजन १५०० कि ग्रॅम अंदाजे किमत ९००० रुपये गाडी कीमत २५००० असा एकुण ३४००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला अप क्र ८४/२०२३ कलम ३७९ भादंवि अन्वये आरोपी आकाश इंगळे विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात हे कॉ अरुण सहारे पुढील तपास करित आहे.